खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंच खानापूर तालुक्याच्यावतीने संगीत भजनी स्पर्धा रविवारी पाडल्या. या स्पर्धेत ३२ स्पर्धकांचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक नारायण मयेकर होते.
प्रास्ताविक एम. व्ही. चोर्लेकर यानी केले. तर दीपप्रज्वलन नगरसेवक नारायण मयेकर, राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, विष्णू सडेकर, निवृत्त मुख्याध्यापक एस. जी. शिंदे, आदीच्याहस्ते करण्यात आले.
विविध फोटोचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आबासाहेब दळवी म्हणाले की, खानापूर तालुका अतिमागासलेला तालुका असला तरी तालुक्यातील अनेक गावात संगीत भजनी मंडळी आहेत. त्यांना सहकार्य करून पुढे नेण्याचे काम आम्हा सर्वांचे आहे. आज श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने या संगीत भजनी स्पर्धा भरविल्या त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कला मंचला आमचा नेहमीच पाठींबा राहिल, असे मत व्यक्त केले.
यावेळी के. पी. पाटील, धनश्री सरदेसाई, बाबूराव देसाई, आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, विलास बेळगावकर आदीनी विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक दयानंद नेतलकर, बाळासाहेब शेलार, नामदेव बेटगिरकर, अर्जून कांबळे, उमेश बुवाजी, मरू पाटील, माजी ता. प. सदस्य अशोक देसाई, मुख्याध्यापक महेश सडेकर, कृष्णा गुरव, तुकाराम कुलम, सहदेव सडेकर, निवृत्त मुख्याध्यापक एम. एन. पाटील, श्रीकांत पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, प्रदीप पाटील, सुनीता मयेकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून संगीत गुरूजी विष्णू सडेकर, संगीत विशारद एम. व्ही. चोर्लेकर, व वेदमूर्ती ज्ञानेश्वर यांचा शाल, मानचिन्ह व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक संजीव वाटपूकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta