खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांचा ५० वा वाढदिवस रविवारी दि. ६ रोजी खानापूर तालुका भाजपा कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी होते.
प्रारंभी माजी भाजपा शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, धनश्री सरदेसाई, वासंती बडगेर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप नेते बाळू सावंत, जयंत तिनईकर, पंडित ओगले, अजित पाटील, तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी संजय कुबल यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले. भावी राजकीयदृष्ट्या सदिच्छा व्यक्त केल्या.
तर उपस्थित भाजप नेते, कार्यकर्ते आदीनी शाल, पुष्पहार व भेट वस्तू देऊन वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या.
यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेंद्र रायका यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta