खानापूर : खानापूर शहर परिसर उपनगराने व्यापला आहे. शहराची लोकवस्ती वाढत आहे. खानापूर शहरात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नाही. संपूर्ण शहराचे सांडपाणी हे मलप्रभा नदीमध्ये सोडण्यात येते.
शहरात ड्रेनेजची सुविधा उपलब्ध नसल्याने या पाण्याचा निचरा देखील गटारीतूनच केला जातो. व हे पाणी मलप्रभेत सोडण्यात येते. नगरपंचायतीने हे सांडपाणी नदीमध्ये न सोडता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी कुप्पटगिरी येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिबा पाटील यांनी केली आहे.
शहरातील सांडपाणी गटारी मार्गे नदीत सोडण्यात येते त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. ही नदी पुढे जाऊन कुप्पटगिरी, करंबळ, जळगे, चापगाव, यडोगा मार्गे वाहते. या गावातील ग्रामस्थ दैनंदिन वापरासाठी हे पाणी वापरतात. दूषित पाणी वापरल्यामुळे या भागात रोगराई वाढली आहेत. जनावरे देखील दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहेत. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या तात्काळ हे सांडपाणी मलप्रभेत सोडणे थांबवावे व पर्यायी जागेत सोडण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जोतिबा पाटील यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta