
खानापूर : आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज रामगुरवाडी इदलहोंड (खानापूर) आयोजित एक दिवसीय पुरोहित, उद्गाता, धर्मप्रचारक कार्यशाळा रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत सरकारी मराठी शाळा रामगुरवाडी येथे संपन्न झाली.
सद्गुरु नामावली, प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने या कार्यशाळेची सुरुवात झाली. सोपान पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.
पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य आशीर्वादाने हिंदू धर्माचं हे विशेष ज्ञान सर्वसामान्य माणसांकडे पोहोचविण्याचे कार्य पूज्य गुरुपीठ करत आहे. व्यसनाधीन झालेल्या समाजाला संस्कार मंडित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन खानापूर विभाग क्षेत्रीय प्रमुख डॉ. गौरेश भालकेकर यांनी केले.
या कार्यशाळेसाठी शिक्षक म्हणून वेदमूर्ती सदानंदजी गावस यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेला 50 हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग दर्शविला.
याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक ए. आर. भोसले सर, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मीताई ठोंबरे, संत समाजाचे अध्यक्ष दत्ता बाचोळकर, धर्मप्रचारक रघुनाथ उत्तुरकर उपस्थित होते.
धर्मप्रचारिका सौ. मीना उत्तरकर यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta