खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यात एकी करून समिती बळकट करण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी भेट घेऊन चर्चा केली. खानापूर येथे बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी सहाय्य करावे अशी विनंतीही केली. यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीच्या सुकाणू समिती सभासदांची बैठक श्री. दीपक दळवी यांच्याअध्यक्षतेखाली होऊन श्री. राजाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठविण्याचे ठरले. बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11=00वाजता शिवस्मारक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर व इतर खेड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांनी तसेच खानापूरातील दोन्ही गटाच्या
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर हजर राहून आपली मते मांडावीत असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta