खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील अग्रीकल्चर कार्यालयासमोर रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर सीडीचे अर्धवट काम झाले होते.
त्यामुळे जांबोटी क्राॅसवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र प्रथमच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बुधवारी दि. ९ रोजी खानापूर दौऱ्यावर येत असल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना गडबडून जाग आली. मंगळवारी जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण केल्याने प्रवाशीवर्गातूनन समाधान पसरले आहे.
म्हणून म्हटले आहे की, मंत्री येता गावा तेथे त्वरीत होतील सुविधा असा अनुभव खानापूरवासीयांना आला.
Belgaum Varta Belgaum Varta