
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विविध कार्यालयात तसेच तालुक्यात आणि खानापूर तालुका भाजप कार्यालयात शुक्रवारी दि. ११ रोजी कनकदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी येथील भाजपच्या तालुका कार्यालयात कनकदास जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष संजय कुबल होते. तर कार्यक्रमाला बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप युवा नेते पंडित ओगले, भाजप नेते किरण यळ्ळूरकर, राजेंद्र रायका, आप्पया कोडोळी, सयाजी पाटील, माजी जि. प. सदस्य लक्ष्मण बामणे, मल्लापा मारीहाळ, सुनिल नाईक, सदानंद मासेकर, रवी बडगेर, प्रकाश निलजकर, आदी उपस्थित होते
यावेळी राजेंद्र रायका यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कनकदासच्या फोटो प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन तर उपस्थित मान्यवरांनी कनकदासाच्या जीवन चरित्रबद्दल विचार व्यक्त केले. भाजप नेते किरण यळ्ळूरकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta