खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणाची उभारणी करून गेल्या दहा वर्षानंतरही आजतागायत मलप्रभा क्रीडांगण अनेक सुविधांपासून वंचीत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
माजी आमदार कै. प्रल्हाद रोमाणी यांच्या काळात उभारणी करून जेवढी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तेवढ्याच आजपर्यंत सुविधा दिसून येत आहेत.
मात्र महत्वाच्या सुविधा म्हणजे क्रीडांगणाला कंपाऊंड भिंत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच क्रीडांगणावर कोणत्याही खेळाची ग्राऊंड मार्किंग नाही. इतर कोणतीच सोय नाही.
गेल्या पाच वर्षांत २ कोटींचा निधी मलप्रभा क्रीडांगण उपलब्ध आहे, अशी चर्चा खानापूर शहरासह तालुक्यात होत होती. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची सुविधा नाही.
आज या मलप्रभा क्रीडांगणावर स्पर्धा घेतल्या जातात. मात्र खेळाडुंना कोणतीच सोय नाही. त्यामुळे खेळाडुंतून नाराजी पसरली आहे. तेव्हा मलप्रभा क्रीडांगणावर लवकरात लवकर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta