खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराची वाढती उपनगरे आणि वाढती लोकसंख्या यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात कामाचा ताण वाढला आहे.
गेल्या काही वर्षापासुन खानापूर नगरपंचायतीचे सात कर्मचारी डेप्यूटेशनवर गेलेले होते. त्यांना गो बॅक करून खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात हजर करावे,अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीचे स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील पी डी अधिकारी ईश्वर उळागड्डी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर, नगरसेवक आप्पया कोडोळी आदी उपस्थित होते.
यावेळी बेळगावचे पी डी अधिकारी ईश्वर उळागड्डी यांनी निवेदनाचा स्विकार करून लवकरात लवकर खानापूर नगरपंचायतीचे डेप्यूटेशनचे कर्मचारी परत खानापूर नगरपंचायती कार्यालयाला पाठविले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta