खानापूर (प्रतिनिधी) : कबनाळी (ता. खानापूर) निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील गाव गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतिक्षेत असल्याने नुकताच खानापूर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई याना निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तसेच निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी कबनाळी रस्त्याबद्दल गाऱ्हाणी मांडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कबनाळी गावाला तीन किलोमीटर अंतराचा रस्ता कच्चा आहे. त्यामुळे गावाला बस येण्यास अडचण होत आहे. कबनाळी गावाच्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी खानापूर बेळगाव आदी शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी पायीच जावे लागते. नागरिकांना खानापूर तालुक्याच्या ठिकाणी जाताना पायीच प्रवास करावा लागतो.
कबनाळी गाव अति जंगलात आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या सुध्दा जंगली प्राणी अस्वल, गवीरेडे, वाघ अशा हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन घडते. त्यामुळे जीवाला धोका संभवतो. तेव्हा कबनाळी गावचा रस्ता तसेच बससेवा व्हावी, अशी मागणी ही निलावडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी केली आहे. त्यांच्यासोबत ८० वर्षाचे आजोबाही समस्या मांडताना दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta