खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर शनिवारी दि. १९ रोजी सीटीएम ट्राॅफी फूटबॉल स्पर्धाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपच्या महिला नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, तालुका ग्राम पंचायत समितीचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, आकाश अथणीकर, सीटीएम ट्राॅफी फूटबॉलचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी स्पर्धेची ओळख करून स्पर्धेला प्रारंभ केला.
Belgaum Varta Belgaum Varta