कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप चालू झाली आहे. धरण क्षेत्रात देखील दमदार अतिवृष्टी बरसत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे. कृष्णा नदीपात्रातील वाढते पाणी तर पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्याने वाढत असलेल्या पाण्याची धास्ती शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पात्रातून पाणी बाहेर पडले आहे. वाढत्या पाण्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे ग्रामीण भागात पुरपट्ट्यात ग्रामस्थांनी महापुराची धास्ती घेतली आहे. स्थलांतरित होण्याच्या विचाराने व परत संसार उघड्यावर पडणार या विचाराने अनेक कुटुंबे चिंतातूर झाल्याचे दिसत आहेत. मळे भागात वास्तव्यास असणारे शेतकरी कुटुंबांचे देखील जनावरांचे तळ इतरत्र हलवावे लागणार या चिंतेत आहेत. त्यांच्या चार्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. या चिंतेने शेतकर्यांचे देखील धांदल उडाल्याचे दिसत आहे.
महापुराच्या धास्तीने अनेक नागरिक स्थलांतराच्या मानसिकतेत आहेत. दुसरीकडे भाड्याच्या घरांचे भाडे दुप्पट झाली आहेत. तर काहींकडून आधीच जास्त पैसे मोजून भाड्याची घरे बुकींग केली जात आहेत. अशीही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर गरीब, कष्टकरी कुटूंब भीती व चिंतेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारण एका बाजूला महापुराची धास्ती तर एका बाजूला रोजगाराची आशा दुहेरी संकटाचा सामना या कुटुंबाना करावा लागणार आहे.
Check Also
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
Spread the love जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …