Friday , April 17 2026
Breaking News

महिला आयोगाच्या अध्यक्षा कोल्हापूरात; “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती कार्यक्रम

Spread the love

 

कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शुक्रवारी कोल्हापूर मध्ये आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“सक्षमा” कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या हस्ते असून, यावेळी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.

या कार्यक्रमात पॉश कायदा नेमकं काय सांगतो, पी.सी.पी.एन.डी.टी. याबाबत जनजागृती, अंतर्गत समितीचे कार्य व जबाबदारी, अंधश्रध्दा निर्मूलन आजच्या काळात का आवश्यक आहे ? या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. “सक्षमा” कार्यक्रम सकाळी 11.00 ते सायं.5.00 या वेळेत आयोजीत करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा.

या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेली २७० महाविद्यालये व संस्थांमधील ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’चे (ICC) अध्यक्ष, सदस्य, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियान समितीचे सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात नोकरदार महिला व विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान करणारा ‘पॉश’ कायदा नेमके काय सांगतो, यावर प्रा. डॉ. भारती पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची रचना, कार्ये, अधिकार आणि तक्रारींवर कार्यवाही करण्याची पद्धत यांबाबत अनुभवी कायदेतज्ज्ञ साधना खटी संवाद साधतील. तसेच, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये चाचणीद्वारे लिंगनिदान करणे हा गुन्हा आहे, यावर डॉ. सुनील कुबेर, गीता हसुरकर आणि ॲड. गौरी पाटील संबोधित करतील. अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरणासाठी आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन का आवश्यक आहे, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या ॲड. सीमा पाटील आणि नंदिनी जाधव आपले विचार मांडतील, मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी

Spread the love  कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *