Tuesday , March 3 2026
Breaking News

पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर; ६४ बंधारे पाण्याखाली

Spread the love

कोल्हापूर : आठ दिवसांपासून संततधार सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्‍यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत आहे. आज (दि. १५) सकाळी 11 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे) पोहोचली. जिल्ह्यातील एकुण ६४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन कक्षाने दिली आहे.

भोगावती नदी पाणी पातळीत वाढ

भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजूबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी सायंकाळी राजाराम बंधार्‍यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत असल्याने खबरदारी म्हणून प्रयाग चिखली व आंबेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटेपासूनच बाडबिस्तारा आवरायला सुरुवात केली. दिवसभरात सुमारे 40 ते 50 टक्के ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून प्रयाग चिखलीच्या बहुतांश ग्रामस्थांनी पुनर्वसन झालेल्या सोनतळी ठिकाणी आसरा घेतला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चिखलीतील सुमारे अडीच ते तीन हजार तर आंबेवाडीतील 800 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हेलिपॅडसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, स्थानिक रेस्क्यू फोर्ससह संबंधितांना सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *