Saturday , October 19 2024
Breaking News

कोल्हापूरात घुमला सीमावासीयांचा बुलंद आवाज!

Spread the love

 

महाविकास आघाडीतर्फे शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध

कोल्हापूर : कर्नाटक सरकारच्या विरोधात तसेच महापुरुषांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.
बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा दुमदुमला. “नही चलेगी नही चलेगी-दादागिरी नही चलेगी”असा इशारा कर्नाटक सरकारला दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह विविध संस्था, संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला‌.
कर्नाटकच्या सरकारकडून मराठी भाषिक सीमावासियांवर होत असलेल्या अन्याय -अत्याचार विरोधात महाविकास आघाडीने कोल्हापुरात आंदोलन पुकारले आहे.
राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन सुरू आहे. याप्रसंगी विविध नेत्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नेते मंडळीचा आंदोलनस्थळी समाचार घेण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, यांच्यासह बेळगावहुन अनेक समिती नेते कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. “रहेंगे तो महाराष्ट्र मे -नही तो जेल मे ” अशा घोषणा देत एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमा लढ्याचा आवाज बुलंद केला. “बेळगाव आमच्या हक्काचे-नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोक्यावर, ”बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.

घोषणा देत शिवसेना ठाकरे गट दाखल
शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, अवधूत साळोखे, महिला आघाडीच्या स्मिता मांडरे, प्रतिज्ञा उत्तुरे , प्रीती क्षीरसागर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत आंदोलनस्थळी दाखल झाले.

आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी महापौर आर‌.के. पोवार, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी गुलाबराव घोरपडे, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, कॉम्रेड दिलीप पवार, चंद्रकांत यादव, माजी उपमहापौर विक्रम जरग, संजय मोहिते, काँग्रेसचे शहराध्यक्ष व स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, राजू लाटकर, आदिल फरास, विनायक साळोखे, प्रकाश नाईकनवरे, भूपाल शेटे, दत्ता टिपुगडे, अशोक भंडारे, अनिल कदम, सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा देवकर, प्राचार्य टी एस पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, विनायक फाळके, दुर्वास कदम, अशोक पोवार,अमर समर्थ, सुलोचना नायकवडी, भारती पोवार, चंदा बेलेकर, गोकुळचे संचालक बयाजी शेळके आदिंचा सहभाग होता. प्रारंभीर दिलीप सावंत यांनी पोवाडा सादर केला. आंदोलन स्थळी पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *