अजित पवारांसमोरच योगेश केदार आणि कार्यकर्त्यांचा राडा
कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं समजलं. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. यावेळी योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ही बैठक कोल्हापुरातील समाजासाठी आहे की राज्यातील मराठा समाजासाठी आहे, असा जाब योगेश केदार आणि कार्यकर्त्यांनी बैठकीदरम्यान अजित पवार यांच्यासोबत विचारला. कार्यकर्त्यांनी टेबलवर हात आटपून गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta