राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत कागल एकात्मिक बाल विकास प्रकल्प
कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी चिमुकल्यानी आई-वडिलांच्या बद्दल केलेली भावना व भाषण ऐकून भारावले. वंदूर ता. कागल येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी तृणधान्यांपासून तयार केलेली श्री गणेश प्रतिमेची आरती करून लहान मुलांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत कागलच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्यावतीने तृणधान्याच्या पोषण तत्वांचा हा अभिनव प्रसार आणि प्रसार करण्यात आला.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, भारतीय आहार पद्धतीमध्ये तृणधान्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तृणधान्यांमध्ये असलेल्या उच्च पोषण तत्त्वांमुळे बालपणापासूनच आहारात तृणधान्यांचा समावेश असावा.
राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत अभियानाचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी सुपरवायझर सौ. वंदना चव्हाण, वंदूर सरपंच सौ. दिपाली उत्तम कांबळे, अंगणवाडी सेविका सौ. सन्मती चंद्रकांत जंगटे, सौ. संगीता विनायक देशमुख, सौ. शिवन्या सचिन पाटील, सौ. रेखा विजय पाटील, सौ. राजश्री नारायण हेगडे समाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, मा.राजेंद्र माने सर आदी मान्यवर उपस्थित होते.
……………………………………………………………
तृणधान्याचा फराळ…..
यावेळी फराळ म्हणून वंदूर ता. कागल येथील अंगणवाडी सेविकांनी तृणधान्यापासून बनवलेली चिक्की, लाडू, पापड असे अनेक पदार्थ आणले होते. मंत्री मुश्रीफ या फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला.