Tuesday , September 17 2024
Breaking News

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापूरातून पाठिंबा

Spread the love

 

आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेण्याचा निर्धार

कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज (10 जून) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून आज (10 जून) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे शंभरहून अधिक पदाधिकारी या निदर्शनामध्ये सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी टाळत मुक निदर्शने केली.

आम्ही आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेणार
यावेळी बोलताना बाबा इंदूलकर यांनी आरक्षणासाठी टाळाटाळ होत असल्याने जोरदार टीका केली. ते म्हणाले की, यांना आता अचानक घटनेची आठवण झाली आहे. जे पाया पडत आहेत तेच आरक्षण घालवत आहेत. ज्यांनी 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यांनीच आता 10 टक्के आरक्षण देत 6 टक्के का कमी केलं? अशी विचारणा बाबा इंदूलकर यांनी केली. याबद्दल ते का बोलत नाहीत? अशीही त्यांनी विचारणा केली. त्यांनी सांगितले की, ज्या कारणासाठी 16 टक्के आरक्षण दिलेल उडालं आहे, त्याच कारणातून हे 10 टक्के आरक्षण उडणार आहे. यांना आरक्षण नको आहे. आम्ही आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेणार असल्याचा निर्धार बाबा इंदूलकर यांनी सकल मराठा समाजाकडून व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

राजकोट येथील शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

Spread the love  कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *