ठाणे : ठाणे शहरातील नव्या दमाचे व सतत वास्तववादी विषयावर रोखठोक व परखडपणे आपल्या लेखणीतून लेखन करणारे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या ” प्रेयसी एक आठवण..” सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला नामवंत जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउदेशीय संस्था महागाव, जि.कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकाच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीला “राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार” दिला जातो. या वर्षी साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी ” राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-२०२४” जाहीर करण्यात आला आहे.
ही गाजत असलेली व वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारी कादंबरी प्रा.डाॅ. संतोष राणे सर यांच्या शारदा प्रकाशन ठाणे या नामवंत प्रकाशन संस्थेनी प्रकाशित केलेली. या कादंबरीला हा पाच महिन्यात दहावा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
“जागर, बेळगाव कुणाच्या बापाचं, बागलकोटची सुगंधा, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती” इत्यादी साहित्य संपदा अर्जुन विष्णू जाधव यांची प्रसिद्ध झालेली असून या साहित्य कलाकृतीना महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळ याचे पुरस्कार मिळाले आहेत.
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या पंतप्रधान घरकुल योजनेचे काही संरपच व ग्रामसेवक यांनी संगमताने तीन तेरा केले आहे या वर आधारित अभ्यासपुर्वक नव्या दमाची नवी कादंबरी “ग्रामपंचायत एक वाटणीदार अनेक..” नावानी लवकरच प्रकाशित होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta