
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्यासाठी अधिकार प्रदान करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज निर्गमित केले आहेत.

बैलगाडी शर्यत परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत व भविष्यात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. परिपूर्ण प्रस्तावासाठी अर्जदारास विहीत मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्रुटींची पूर्तता करणे जिकीरीचे होत असल्याने जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकार संबंधीत महसूल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत.
उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक 05 मार्च 2022 रोजीच्या पत्रानुसार उमळवाड, ता. शिरोळ येथे बैलगाडी शर्यत आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याबाबत पारित करण्यात आलेल्या आदेशामध्ये अवलंबण्यात आलेल्या कार्यपध्दती नुसार व आदेशामध्ये नमुद अटी व शर्तींचे पालन करणेच्या अटीस अधिन राहून बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात नमुद आहे.
Belgaum Varta Belgaum Varta