
पत्रकार पी. ए. पाटील लिखित पुस्तक प्रकाशन
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजश्री शाहू महाराजांनी पंजाबच्या पैलवानांना हरवणारे पैलवान कोल्हापूरच्या आखाड्यात घडवले, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. ते रविवारी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथ ’रग तांबड्या मातीची…. झुंज वाघाची’ या पत्रकार पी. ए. पाटील, सदानंद पुडपाळ लिखित प्रकाशन सोहळ्यावेळी शाहू स्मारक येथे बोलत होते.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, पै. जोशिलकरांचे जीवनचरित्र नवीन पैलवानांना प्रेरणादायी ठरेल. तर चंदगड तालुक्यातील किणी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या जोशिलकरांचा जीवनप्रवास कौतुकास्पद असल्याचे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी या जीवनचरित्राचे लेखक पत्रकार पी. ए. पाटील, सदानंद पुडपाळ यांचा सत्कार केला. यावेळी माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी मंत्री भरमू पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील उपस्थित होते. आभार एकनाथ पाटील यांनी मानले.
यावेळी आर. जी. पाटील, पै. विनोद चौगुले, संभाजी वरुटे, अण्णा देसाई, अंकुश कावळे, जॉर्ज क्रूज, मामा भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta