बेंगळुरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यातील बेळगावसह 11 जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पालकमत्र्यांना दिल्या आहेत. कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग अजुनही कमी झाला नसल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे चर्चा केली.
मागील लॉकडाऊन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे १४ जूनपर्यंत कायम होते, त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून २१ जूनपर्यंत कायम ठेवण्याचा घेण्यात आला आहे.
पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, जिल्ह्यात १३५ संघानी १३०९ खेड्यातून रॅपिड कोविड टेस्ट घेतली आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटे करिता खबरदारी म्हणून मुलांसाठी कोविड रुग्णालये सुरू करण्याची तयारी केली आहे.