खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदीच्या काठावरील श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या आवारात रोप लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.
असोगा हे प्रेक्षणिय स्थळ असून या ठिकाणी अभिमान या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. आज या ठिकाणी सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या स्थळाची प्रगती झाली नाही.
हे लक्षात घेऊन लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने विरेश हिरेमठ यांनी उपक्रम राबवुन बेलाच्या रोपांची लागवड केली.
या कार्यक्रमात मंदिराचे पुजारी बसवराज, शुभम पाटील, मोहन नंदगडकर, कल्लापा नंदगडकर, जोतिबा मिसाळ, माजी ग्राम पंचायतीचे सदस्य रमेश पाटील, बाळू कणबरकर, रवी किल्लेकर व इतर सदस्य उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.
Check Also
खानापूर – पारीश्वाड मार्गावर दुचाकी – बसचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
Spread the love खानापूर : खानापूर – पारीश्वाड मार्गावर दोड्डहोसुर गावानजीक दुचाकी आणि बसचा समोरासमोर …