बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी आज 7 जुलै 2021 रोजी श्री. महादेव कृष्णा लाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांकरिता वह्या, दप्तर, पॅड आणि इतर शैक्षणिक साहित्य आज युवा समिती पदाधिकार्यांकडे सुपूर्द केले.
युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी श्री. महादेव लाड यांचे अभिष्टचिंतन केले आणि युवा समिती उपक्रमाची माहिती दिली. मागील 2 वर्षांपासून कोविड महामारीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या परिवारातील विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप सुरू आहे आणि भविष्यात सुद्धा हा उपक्रम सुरूच राहील असे सांगितले.
यावेळी श्री. महादेव कृष्ण लाड, लक्ष्मण(बाळू) शंकर पाटील, विनायक शंकर चौगुले, सदानंद कदम, युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, वासू सामजी, आशीर्वाद सावंत, आशिष कोचेरी, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा; एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका
Spread the love मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत असतानाच काळजीवाहू …