Sunday , September 20 2026
Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर घटप्रभा नदीपात्रात कोसळला ट्रक

Spread the love

 

बेळगाव : संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या घटप्रभा नदीपात्रात कोसळला.

राष्ट्रीयर महामार्गालगत असलेल्या घटप्रभा नदीत ट्रकला जलसमाधी मिळाली असून बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावाजवळील घटप्रभा नदीपात्रात हा अपघात घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकमधून उडी मारून आपला जीव ट्रक चालकाने वाचवला आहे.

सदर ट्रक संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येत होती. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या माध्यमातून ट्रक बाहेर काढला. या घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *