Sunday , September 20 2026
Breaking News

मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत

Spread the love

 

बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत बेळगाव येथील रुग्ण पुष्पलता दामोदर भोसले यांना एक लाख रुपयाच्या निधीचे युटीआर पत्र त्यांच्या नातेवाईकांना सोपण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सहायता निधीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रमुख्याने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्य प्रमुख श्री. मंगेश चिवटे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळींचे भोसले परिवाराच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त केले.

या योजनेची पाठपुरावा करून ज्यांनी ही सीमाभागात अंमलबजावणी करण्याकरिता सिंहाचा वाटा घेतलेले श्री. रमाकांत कोंडुस्कर यांनी गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्रा. आनंद आपटेकर, श्रीनाथ पवार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *