मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीमध्ये संभाजी राजे हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे, शरद पवार यांनी यासंबंधी माहिती दिली. दरम्यान राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे आता संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शरद पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाची मतसंख्या आहे, त्यावर हा निकाल आहे. मविआतील पक्षांशी अद्याप चर्चा केली नाही, पण राष्ट्रवादी पक्षापुरतं सांगायचे झाल्यास आमचा एक प्रतिनिधी निवडून यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्यासाठीच्या मतांची गरज भागून आमच्याकडे 10 ते 12 मतं आमच्याकडे शिल्लक राहतात, शिवसेनेकडं सुध्दा काही मतं आहेत त्यांनाही काही अडचण नाही, काँग्रेसचा आकडा कमी जास्त असेल तर आमचे लोक त्यांना अनुमोदन देतील असे सांगितले.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मतं शिल्लक राहतात. तर अपक्ष आमदारांची संख्या धरून एकूण 46 मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना राज्यसभेत निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …