Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात आयटी कंपन्यांना वनजमीन देण्यास विरोध

Spread the love

बेळगाव : बेळगावमधील माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या वंटमुरी कॉलनी, श्रीनगर आणि काकती येथील 745 एकर क्षेत्र वन विभागाला देण्यात आले आहे. हा परिसर आयटी, बीटी खासगी कंपन्यांना हस्तांतरित करण्याचा विचार असून याविरोधात येथील स्थानिकांनी सोमवारी श्रीनगर साई बाबा मंदिरापासून पदयात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवेदन सादर केले.
माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या वंटमुरी कॉलनी, श्रीनगर आणि काकती येथील वनजमीन आयटी, बीटी खासगी कंपन्यांना हस्तांतरित करण्याचा विचार असून याविरोधात येथील स्थानिकांनी सोमवारी श्रीनगर साई बाबा मंदिरापासून पदयात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवेदन सादर केले.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवाजी कागणीकर म्हणाले, 745 एकर जमीन परिसरात सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून विविध झाडांचे संरक्षण करण्यात येत आहे. शिवाय अनेक झाडांची लागवड देखील करण्यात आली आहे. मात्र सध्या यासंदर्भात वेगळ्याच गोष्टी कानावर येत असून सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात आयटीबीपी कंपन्या स्थापन करण्याचा विचार सुरु आहे. सरकारकडून अरण्य वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उपक्रम आखण्यात येतात. बेळगावमधील वातावरण हे आल्हाददायी आहे. येथील निसर्गसंपन्न वैभवामुळे बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखण्यात येते. याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे राजकुमार टोपाण्णावर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी आम आदमी पक्षाचे राजकुमार टोपाण्णावर, वकील आर. पी. पाटील, एन. आर. लातूर, सुजित मुळगुंद, शंकर हेगडे, अखिला पठाण आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *