Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव शहरात घरफोडी, चोरीच्या घटनेत वाढ

Spread the love

बेळगाव : बेळगावमधील टिळकवाडी परिसरातील शिवाजी कॉलनी येथील विविध भागात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून याची धास्ती आता नागरिकांनी घेतली आहे. चोरी करणारी टोळी सध्या सर्वत्र वावरत असून याला आला घालण्याची मागणी शहर पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहर, परिसर आणि उपनगरांमध्ये चोरीच्या प्रकरणात वाढ होत चालली असून शिवाजी कॉलनी, शांतीनगर, गजानन महाराज कॉलनी यासह अनेक परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. दारबंद असलेल्या घरावर लक्ष ठेवून अशाच घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. नुकताच असा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सध्या हि चोरांची टोळी अनेक परिसरात बेफामपणे चोर्‍या करत आहे. या चोरांना कोणतीही भीती नसून बिनधास्तपणे अनेक भागात चोरांचा वावर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाजी कॉलनी येथील एक घर, शांतीनगर येथील 3 घरे, मोनिका जनरल स्टोअर्स शेजारी असलेले एक घर यासह गजानन महाराज नगर येथे एकाचदिवशी 6 घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. हातात शस्त्र घेऊन वाहनातून आलेल्या या चोरांनी बिनधास्तपणे डल्ला मारून पोबारा केल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत आहे.
11 मे रोजी रात्री 2 च्या सुमारास शिवाजी कॉलनी येथील सुरजित राजपूत यांचा घरावर डल्ला मारून 19 तोळे सोने, चांदीचे दागिने यासह 13 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी पोबारा केला आहेत. हा एकाच परिसर नसून अनेक न्यू शिवाजीनगर, शांतीनगर आणि गजानन महाराज नगर येथील घरात देखील चोरी झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदविण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

खडेबाजार पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड; एक आरोपी अटकेत

Spread the love  बेळगाव : खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगार विरोधात कारवाई करत एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *