नागपूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्यास इच्छूक असलेले संभाजीराजे छत्रपती यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आराेप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करून संभाजीराजे यांच्या कोंडीसाठी थेट शरद पवार यांना जबाबदार धरले आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, ज्याप्रकारे पहिल्यांदा शरद पवार यांनी हा विषय सुरु केला, नंतर हा विषय ज्या दिशेने गेला त्यामुळे या सगळ्याच विषयाला वेगळे वळण लागले आहे. मला असं वाटतं की त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. मात्र, हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही.
राज्यसभा निवडणूकीबाबत देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणूकीच्या जागांबाबत बराच खल झाला. या बैठकीनंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबतचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देऊ केले आहेत. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा द्यायचा किंवा नाही, याचा निर्णय आता सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचे समजते.
ही जागा लढवायची की नाही, याबाबत भाजपने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. याच जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे ही जागा लढवून मराठा समाजाचा रोष पत्कारायचा अथवा संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देऊन छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखायचा, याबाबत अद्याप भाजपचा निर्णय झालेला नाही.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …