Saturday , September 21 2024
Breaking News

‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका! : रमेश शिंदे

Spread the love

कोल्हापूर : कर्नाटक राज्यात ‘हलाल’च्या सक्तीच्या विरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. मूळ मांसासाठी असणारे हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, रुग्णालये यांच्यासह ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी घेतले आहे. त्यांची भारतातील सर्व दुकाने 100 टक्के ‘हलाल’ प्रमाणित असल्याची घोषणा केली आहे. ‘मॅकडोनाल्ड’मध्ये जाणार्या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार ‘हलाल’ पदार्थच खाऊ घालणे, हा हिंदूंच्या संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा अनादर आहे. अशाप्रकारे धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ भारतात उभी केली जात आहे. जागतिक स्तरावर ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात असल्याची माहिती आहे. भारतातही ‘जमियत उलेमा-ए-हिन्द’ देशभरातील विविध बाँबस्फोटांत सहभागी सुमारे 700 मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहेत. हलाल अर्थव्यवस्थेमुळे केवळ भारतीय अर्थव्यवस्थेला नाही, तर सुरक्षा व्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात केंद्र शासनाने गांभीर्याने तात्काळ कृती करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लेखक तथा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले. ते अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘जिहादी आतंकवादाचा प्रतिकार’ या सत्रात ‘हलाल सर्टिफिकेशन या आर्थिक जिहाद?’ या विषयावर बोलत होते. अधिकाधिक लोकांना ‘हलाल जिहाद’ची माहिती होण्यासाठी ‘हिंदी’ आणि ‘मराठी’ भाषेतील हा ग्रंथ प्रत्येक हिंदूंपर्यंत पोचवावा, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी या प्रसंगी केले. या सत्रात ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, ‘हिंदु मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, तसेच कर्नाटक येथील चित्रपट वितरक तथा उद्योजक श्री. प्रशांत संबरगी यांनीही मार्गदर्शन केले.
भारत व हिंदु धर्म यांवर आघात करण्यासाठी ‘बॉलीवूड जिहाद’चे षड्यंत्र! : प्रशांत संबरगी, चित्रपट वितरक


18 ते 24 वर्षे वयोगटातील युवकांना ते हिंदू आहेत, हे विसरून त्यांच्यावर पाश्चात्त्य, मुसलमान विचारसरणीचा पगडा कसा वाढेल, असे प्रयत्न ‘बॉलीवूड’मधील चित्रपटांच्या माध्यमातून केले जात आहेत. वर्ष 2019 मध्ये गुजरात येथे 250 चित्रपटांचे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यानुसार मुसलमानांची श्रद्धास्थाने शक्तीशाली आहेत, मुसलमान मानवतावादी आहेत, तर याउलट ब्राह्मण भ्रष्टाचारी अन् वाईट आहेत, असे दाखवण्यात आले आहे. ‘बॉलीवूड’मध्ये प्रत्येक वर्षी सुमारे 3 हजार गाणी प्रसारित होतात. त्यातील 30 टक्के गाण्यांमध्ये ‘अल्ला’चे गुणगान केलेले आढळते. याउलट केवळ 4 टक्के गाण्यांमध्ये हिंदूंच्या देवतांची स्तुती असते. यामागे ‘दुबई फंडींग’ आणि ‘कराची डिस्ट्रिब्युशन’ हे सूत्र आहे. कुख्यात गुन्हेगारांचा काळा पैसा ‘बॉलीवूड’ चित्रपट निर्मितीसाठी लावण्यात येतो. त्यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जाते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथून अंमली पदार्थ हे पंजाबमार्गे भारतभरात वितरित केले जातात. एकूणच भारत आणि हिंदु धर्म यांवर आघात करण्यासाठी ‘बॉलीवूड जिहाद’चे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन कर्नाटकातील चित्रपट वितरक तथा उद्योजक श्री. प्रशांत संबरगी यांनी केले. ते ‘बॉलिवूडचा ड्रग्ज जिहाद’यावर बोलत होते. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Spread the love  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *