Wednesday , December 10 2025
Breaking News

शिंदेसेनेला भाजपचा पाठिंबा, एकनाथ शिंदेंकडून मान्य!

Spread the love

गुवाहाटी : एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सांगितलं. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितले. कुठेही कमी पडणार नाही.. असे सांगितले.

कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. आपलं सुख, दु:ख सारखंच आहे. विजय आपलाच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला या प्रकरणात क्लीन चिट दिला असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र, राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याची कबुली दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेय. त्यामुळे आता लवकरच एकनाथ शिंदे भाजपबरोबर सत्तास्थापनेचा दावा करु शकतात.
राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधन करत भावनिक साद घातली. तुम्ही समोर येऊन बोला, मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडलं. या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली. शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांसोबतच खासदारही शिंदेच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ठाणे आणि केडीएमसीमधील काही नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवलाय. आता एकनाथ शिंदे यांनी या बंडामागे भाजपचा सपोर्ट असल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलेय.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *