मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांनी, मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ज्यानंतर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
संजय राऊत याच्या अडचणी मागच्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहेत, दुसर अरेस्ट वॉरंट कोर्टाने संजय राऊत यांना बजावलं आहे. मेधा सोमय्या ज्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी आहेत त्यांनी संजय राऊतांनी कुठलाही पुरावा नसताना केलेल्या आरोपांबद्दल गुन्हा दाखल केला होता.
मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टामध्ये अब्रुनुकसानीची केस केली होती. कोर्टाने तिन दिवसांपूर्वी बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलं होतं. आज त्या वॉरंटच्या कॉपी संजय राऊत ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या कांजूर पोलिस स्टेशनमध्ये पाठवली आहे. आता पोलिस पुढची कारवाई करतील.
Check Also
उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग
Spread the love नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. …