कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना २०२२ सालचा ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरु, उद्धव कांबळे यांच्या निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. या प्रबोधन पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी संपादक उत्तम कांबळे व समन्वयक डॉ. मिलिंद कसबे यांनी या पुरस्कारांची आज घोषणा केली.
२०२१ सालचा कॉ. गोविंद पानसरे पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत गेल ऑम्वेट यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला होता. तर २०२२ सालचा कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना जाहीर झाला आहे. रुपये पंचवीस हजार व स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. अशी माहिती पुरस्कार समितीचे समन्वयक डॉ. मिलिंद कसबे यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारांमध्ये युवराज बावा, इरफान शेख, आबा थोरात यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रूपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. सदर पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे होणार आहे. या अगोदर कॉ. मुक्ता मनोहर, दत्ता देसाई, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाहिर शितल साठे, कॉ. किरण मोघे इ. मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta