मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नागपुरात घ्यावे यासाठी राज्यपाल यांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही. तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे नागपुरात अधिवेशन घेता येणार नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक 9 फेब्रुवारीला सांगितले होते.
करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. वर्षातून किमान तीन अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. साधारणत: तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. बोटावर मोजण्याइतके पावसाळी अधिवेशनही नागपूरला झाले आहेत. परंतु, कोरोनाच्या कारणामुळे दोन वर्षांत एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 28 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे पत्रक निघाले होते, हे विशेष…
9 फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी विधिमंडळ सचिवालय यांनी जी माहिती पुढे ठेवली त्यानुसार नागपूरमध्ये अधिवेशन घेतल्यास राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृह नाही, आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. अशात आजच्या घडीला अधिवेशन नागपूरला घेणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे. या शिफारशीनुसार 15 फेब्रुवारीला होणार्या समितीच्या बैठकीत अधिवेशन मुंबईत घेण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. आज झालेल्या बैठकीत अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …