मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले त्यानंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत. चंद्रकात पाटलांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे म्हणत, फडणवीसांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले त्यावर वेगळे अर्थ काढले. आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो माध्यमांचे काम असते. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील येईल.
Belgaum Varta Belgaum Varta