मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटक केलेल्या संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी राऊतांना जामीन मिळणार की कोठडी? याकडे लक्ष लागून राहिले असून, ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊतांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे.
यापूर्वीच्या राऊतांना अटक करण्यात आल्यानंतर ईडीने राऊतांना आठ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, राऊतांच्या वकीलांनी केलेला युक्तीवादानंतर कोर्टाने ईडीची आठ दिवसांच्या कोठडीची मागणी अमान्य करत त्यांना आजपर्यंतची कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपणार असल्याने राऊतांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाणार असून, राऊतांची कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीकडून करण्यात येणार आहे. त्यावर कोर्ट राऊतांना बेल देणार की कोठडी वाढवून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta