Wednesday , December 10 2025
Breaking News

राज्यात तातडीने ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा ! : हिंदु जनजागृती समितीची मागणी

Spread the love
कोल्हापूर : पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल’असे सांगत आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आलीएका हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ मिशनर्‍यांना अटक केलीपालघर जिल्ह्यातील डहाणूतलासरीजव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहेतराज्याची राजधानी मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यात अशा घटना घडणेहे अत्यंत गंभीर आहेधर्मांतराची समस्या ही केवळ राज्याची नव्हेतर देशाची मोठी समस्या आहेस्वासावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच’ असे म्हटले होतेपुन्हा भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतीलतर धर्मांतरबंदी व्हायलाच हवीयासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहेम्हणूनच गुजरातमध्य प्रदेशउत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावाअशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉउदय धुरी यांनी यांनी केलीहिंदु जनजागृती समितीच्या वतीने पालघर येथील गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होतेया वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौनयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्रीबळवंत पाठक उपस्थित होते.
डॉउदय धुरी पुढे म्हणाले की, यापूर्वीही पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांत आदिवासी हिंदूंचे धर्मांतर केल्याचे प्रकार घडले आहेतयामुळे हिंदू आणि धर्मांतरित हिंदु यांच्यात सणउत्सव साजरे करण्यावरून वारंवार वाद निर्माण होत आहेतपोलीस आणि प्रशासन यांनी धर्मांतराचे असे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काढावीअशी मागणी स्थानिक नागरिकांनीही केली आहे. ‘लंगडा चालू लागेल’, ‘आंधळ्याला दिसू लागेल’ आदी धादांत खोटा प्रचार करणार्‍या ‘चंगाई सभां’चा देशभरात सुळसुळाट चालू आहेया सभांतून गोरगरीब हिंदूंना धर्मांतरित केले जातेराज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही अशा खोट्या चमत्कारांचा प्रसार मिशनर्‍यांनी उघडपणे चालवला आहेयाविषयी राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठेका घेतलेली अंनिस पण गप्प आहेतरी असे चमत्कार दाखवून भोळ्या हिंदूंना फसवणार्‍या पाद्र्यांवर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करावीअशी मागणीही यानिमित्ताने आम्ही करत आहोत.
देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याविषयी आम्ही केंद्र सरकारकडेही यापूर्वीच मागणी केली आहेआपल्या देशात प्रतीवर्षी 10 लाख हिंदू धर्मातरीत होत आहेतनागालँडमिझोराममेघालयअरूणाचल प्रदेशमणिपूर ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेतअनेक राज्यांत धर्मांतराच्या घटनांमुळे ख्रिस्ती लोकसंख्या वाढत चालली आहेभारतात हिंदु नऊ राज्यांमध्ये अल्पसंख्य झाले आहेतअहिंदु लोकसंख्येच्या विस्फोटाचा परिणाम देशाच्या धार्मिक संतुलनावर होत आहेआधीच देशात लव्हजिहादच्या माध्यमातून हिंदु युवतींच्या धर्मांतराची समस्या ज्वलंत आहेत्यात ख्रिस्ती धर्मांतरेही मोठ्या प्रमाणात चालू आहेत यांवर आता नियंत्रण आणायला हवेअसे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौनयना भगत यावेळी म्हणाल्या

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *