Tuesday , December 9 2025
Breaking News

रऊफसोबत बैठकीचा आरोप, पेडणेकरांनी थेट कोश्यारी-फडणवीस-शेलारांचं ’मेमन’ कनेक्शन दाखवलं!

Spread the love

 

मुंबई : किशोरी पेडणेकर यांची याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. आता फडणवीस आणि कोश्यारी यांच्या चौकशीचीही मागणी करणार का? असा प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना विचारलाय.
याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकुब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतली असल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने जारी केला. ज्या याकुब मेमनने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो जणांना रक्तबंबाळ केलं, त्याच्या नातेवाईकासोबत किशोरी पेडणेकर बैठक कशा घेऊ शकतात? असा सवाल करत मविआ नेत्यांचे आणि मेमनच्या कुटुंबियांच्या संबंधांची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाने केली. यानंतर किशोरी पेडणेकरांनी आक्रमक पवित्रा घेत भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत भर पत्रकार परिषदेत मेमनचे फडणवीस आणि कोश्यारींसोबतचे फोटोच दाखवले.
बडा कब्रस्तानच्या समोर पाणी भरलं असल्याने मी तिथे गेले होते. मी बडा कब्रस्तानमध्ये गेले असल्याचं नाकारलंच नाही. पण मी महापौर असताना माझ्या नेत्याने सांगितल्याने तिथे गेले होते. बैठकीला कोण कोण होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला सातत्याने टार्गेट करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. आमचा गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यालर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे. माझ्या नेत्याने मला तेथील पाहणी करण्यास सांगितलं. मग बैठकीत कोण कोण उपस्थित आहे, याची मी काय माहिती घेत बसू का? तिथे बैठकीला कोण कोण होतं, याची मला माहिती नाही. पण वडाला पिंपळाची साल लावण्याचा हा प्रकार आहे, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *