मुंबई : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाच्या (ईडी) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे.
गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज (२१ ऑक्टोंबर) सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने यावर २ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta