Wednesday , March 4 2026
Breaking News

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव डंपरच्या धडकेत ठार

Spread the love

 

कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. प्रेमाची भाकरी असे या हॉटेलचे नाव होते. हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.

कल्याणी कुरळे हिने आठवडाभरापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या.., असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. तिने झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर तिने सन मराठी या वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.
कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *