Wednesday , March 4 2026
Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन; मराठी साहित्य विश्वात शोककळा

Spread the love

 

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केलं आहे. चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचं निधन झालं.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये झाला होता. त्यांची अत्यंत खडतर परिस्थितीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देगलूर महाविद्यालयातून पदवी घेतली. नंतर एम. ए. ला मराठवाडा विद्यापीठातून केलं. त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्यावर पीएचडी केली होती.

पुढे त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात 19 वर्षे अध्यापनाचे काम केलं. नंतर ते 1996 ते 2006 या काळात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख होते. 2005 ते 2010 अशी पाच वर्षे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरु देखील होते. कुलगुरू म्हणून मलेशिया येथील कुलगुरू परिषदेत सहभाग घेतला होता. ते महाराष्ट्रा शासनाच्या भाषासल्लागार समितीचे अध्यक्ष देखील होते.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *