मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिंदे गटावर आणि सरकारवर जोरदार हल्ला केला.
संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असे संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, शिंदे गटामध्ये सध्या काय सुरुय, कुणाचं बिनसलंय याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. यांच्या पिढ्यांना ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही.
सुरक्षेच्या बाबतीत बोलतांना राऊत म्हणाले, यांनी आमच्या सुरक्षा काढल्या पण काहीही फरक पडत नाहीत. त्यांनी स्वतःच्या सुरक्षा काढून बघाव्यात मग कळेल महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ती. असं म्हणून संजय राऊत यांनी जतमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्याबद्दलही विधान केले. त्या पाण्यात सरकारने जलसमाधी घ्यावी, असे राऊत म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta