माणगांव (नरेश पाटील) : माणगांव खंदाड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही 41 वे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर ग्रंथाचे सामुदायिक पारायण सप्ताहाचे आयोजन दि. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत
करण्यात आले होते. पारायण सोहळ्याचे आयोजन माणगांव सोनभैरव मंदिर खांदाड येथील ग्रामस्थ सद्गुरू सेवा परिवार यांनी केले होते. परमपूज्य श्री सद्गुरू शंकर दगडे महाराज, आंदोरी जि. सातारा व परमपूज्य सद्गुरू श्री.पांडुरंग सुतार महाराज व गुरुमाता सुनीती पांडुरंग सुतार महाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे समुदायिक पारायण पार पडले. परायणाचा शुभारंभ कलश पूजन, वीणा पूजन, गुरुवर्य श्री. अजित सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 वाजता काकड आरती, तसेच सकाळी 8 ते 12 व दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, दुपारी 12 ते 1 व सायंकाळी 5 ते 6 व प्रवचन तसेच सायंकाळी 7 ते 8 प्रवचन तसेच सायंकाळी 7 ते 8 हरिपाठ, व रात्री 9 ते 11 कीर्तन तसेच रात्री 12 ते 5 हरीजगर तसेच 1 मार्च रोजी 5 वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता समारोह सद्गुरु सेवा मंडळ माणगांव यांच्या हस्ते तर 2 मार्च रोजी सकाळी 10 वा. दिंडी सहल पार पडला. या सोहळ्याला नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, दत्तात्रेय शिंदे, अशोक माने, भाऊ पांडे, कानोजे आण्णा, मारुती पवार, सचिन कुलकर्णी, पांडुरंग पवार, पांडुरंग सुतार, अप्पा गायकवाड, शरद सुतार, किरण जाधव, दत्ताराम पोवार, काशीराम पोवार, अनंता पोवार, दत्तात्रय जाधव, राजाराम जाधव, अशोक आंबूर्ले तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. टांगले महाराज, यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता झाली.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …