मुंबई : दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआयकडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयकडकून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे.
दिशा सालीयन हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केली. दिशा सालीयनचा मृत्यू हा इमारतीवरुन पडून झाला असल्याचा निष्कर्ष सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काढला होता. मात्र, दिशा सालीयन प्रकरणाचा वेगळा तपास हा सीबीआयकडे नव्हता. सुशांत मृत्यूप्रकरणातील ‘एयु’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा आरोप खासदार राहुल शेवाळेंनी लोकसभेत केला. त्याचे पडसाद गुरुवारी महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात वादंग उठला होता. त्यामुळे आता सीबीआयने याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta