मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आवाहन
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने “चलो कोल्हापूर” मोर्चा आणि धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव आणि परिसरातील नागरिक व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सकाळी लवकर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन सर्वांनी वेळेवर कोगनोळी नाक्यावर जमावे. नागरिकांनी मोटरसायकल, चार चाकी वाहने, बसने पोहोचावे, मोटरसायकल वाहकांनी हेल्मेट घालावे. साऱ्यांनी एक वेळचे जेवण आणि पाणी आणावे, असेही आवाहन केले आहे.