माणगांव (नरेश पाटील) : मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सौ. इंदुरीकर यांचे कीर्तन तसेच महिला वर्गासाठी पैठणी खेळ 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. जनतेकडून सदर कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. महिलांच्या विविध खेळांनी कार्यक्रमाची सुरवात झाली. पैठणीच्या खेळाचा महिला वर्गाने विशेष आनंद घेतला त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर उत्सवमूर्ती देवेंद्र गायकवाड यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम निजामपूर तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, उद्योजक तसेच राजकीय नेते यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व उपस्थितांनी गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव केला.
Check Also
अर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित
Spread the love ठाणे : निर्भिड व परखडपणेच लिहिणारे नव्या दमाचे लेखक, कवी आणि पत्रकार …