Monday , September 21 2026
Breaking News

माझ्या कार्यामुळेच माझा सन्मान : नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार

Spread the love

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव तालुका पत्रकार संघटना आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत असताना नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार म्हणाले की, पत्रकार संघाने आज जो माझा गौरव केला आहे तो माझ्या कर्तृत्वामुळे.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री आदिती तटकरे, माणगांव, महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले, पं. समिती अध्यक्ष अलका जाधव, शिवसेनेचे नेते प्रमोद घोसाळकर, माजी नगराध्यक्ष जआनंदशेठ यादव, राष्ट्रवादी काँ. ता.नअध्यक्ष सुभाष केकाणे, भाजप ता. अध्यक्ष संजयआप्पा देवळे, शेकापचे ता. चिटणीस महेश मोरे, माणगांव तालुका पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सलीम मुबारक शेख सह आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, पत्रकार संघातर्फे ज्यांचा ज्यांचा सत्कार केला आहे ती त्यांच्या कार्याची पोच पावती आहे. आज या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला.  माझ्या राजकीय वाटचालीत सतत जनउपयोगी कार्य केले आहे त्यामुळेच माझा सत्कार करण्यात आला असे मी समजतो.

पुढे पवार म्हणाले की, माणगांव भावात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भातपिकाला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असणार. पत्रकार संघाबद्दल बोलताना पवार म्हणाले की, पत्रकार संघटना नेहमीच समाजउपयोगी कार्य करत असते त्यामध्ये आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी आहोत.

यावेळी माणगांव ता. पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे व जेष्ठ सल्लागार माजित हाजिते यांनी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *