पुणे : गुरुवार दि. 5 रोजी पुणे येथे बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे बेळगावकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धा 5 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी अंतिम सामना व बक्षीस समारंभ सोहळा होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. केदारी शिवणगेकर होते. उद्घाटक म्हणून लाभलेले सिंहगड पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. शशिकांत पवार, श्री. रमेश चरवड, श्री. लक्ष्मण काकतकर, श्री. मारुती वानी, श्री. परशुराम वीर, श्री. अजित पाटील, श्री. नितीन सुर्वे, श्री. ज्ञानेश्वर गावडे, श्री.गोविंद गायकवाड, श्री. ज्ञानेश्वर गावडे, श्री. रामचंद्र निलजकर व संचालक मंडळ, टीम मालक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत 28 संघांनी भाग घेतला आहे.
या स्पर्धांचे वैशिष्ठ्य म्हणजे पुणे येथे खानापूर बेळगाव तालुक्यातील, उद्योजक, कामगार वर्ग पुणेस्थित बेळगावकर नागरिक यांना एकत्रितय संघटित करून खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धांना खुप महत्त्व आहे.
ह्या स्पर्धेतून जमणारा निधी बेळगाव व खानापूर तालुक्यातील पुणेस्थित नागरिकांच्या हितासाठी वापरला जातो. ह्या स्पर्धांना मोठ्या संख्येने पुणेस्थित बेळगावकर नागरिक उपस्थित राहून संस्थेला सहकार्य करत असतात. त्यामुळे आज 7 वर्षे व्यवस्थितरित्या वाटचाल करताना दिसत आहे, असे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले.