माणगांव (नरेश पाटील) : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून नगरपंचायत माणगांवकडून सन्मान सोहळा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत. सदर कार्यक्रम महिला, बालकल्याण व युवक कल्याण समितीचे सभापती शर्मिला शोभन सुर्वे यांनी आयोजित केला आहे. सदर उपक्रम मंगळवार दि. 08 मार्च रोजी माणगांव नगरपंचायतीच्या आवारात संपन्न होणार आहे.
दि. 8 मार्च रोजी सायंकाळी 4.30 ते रात्री 8.30 पर्यंत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार, कर्मचाऱ्यांचा सत्कार, कर्तबगार महिलांचा सत्कार व मार्गदर्शन त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच दि. 9 मार्च रोजी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे होणार आहे. हे शिबीर सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रुती निकम, सिद्धी कामेरकर, निलिमा यादव, अस्थीरोग तज्ञ डॉ. अभिजित मेहता, जगदीश पटेल, हृदयरोग तज्ञ डॉ. अजय मेहता, डॉ. तुषार शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जनरल सर्जन अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, संतोष कामेरकर यांचीही उपस्थिती असणार आहे.
महिला आरोग्य शिबिराचे प्रमुख उद्घाटक मा.ना.सुभाष देसाई मंत्री उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र तसेच प्रमुख उपस्थिती प्रियंका चतुर्वेदी शिवसेना राज्यसभा खासदार, मा.डॉ. महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी रायगड, डॉ. सुहास माने जिल्हा शल्या चिकित्सक, प्रमुख पाहुणे मा. राजीव साबळे. शिवसेना नेते, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेवजी पवार नगराध्यक्ष, माणगांव नगरपंचायत हे उपस्थित राहणार आहे.